या पुस्तकाचं उद्दिष्ट काय? मोठ्या चुका टाळणं आणि सहजपणे वापरता येतील अशी गुंतवणुकीसंबंधीची धोरणं आखण्यासाठी वाचकाला योग्य दिशा दाखवणं...
‘सर्वसामान्य माणसाला योग्य प्रकारे गुंतवणुकीच्या संदर्भातली योजना आखता आणि ती अमलात आणता यावी’ हे या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. शेअर्स किंवा बाँड्स यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यासंबंधीच्या विश्लेषणाच्या तंत्रज्ञानाचा इथे फार उहापोह केलेला नाही. गुंतवणुकीशी संबंधित असली मूलतत्त्वं आणि गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन यांवर मुख्य भर देण्यात आलेला आहे.......